Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी नवउद्योजक बनले पाहिजे ... रामदास माने...



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 उद्योजकीय उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची अंतरीक प्रेरणा आणि उत्साह महत्त्वाचा असून हीच प्रेरणा नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत करते असे प्रतिपादन श्री.रामदास माने यांनी केले.  पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालयात एकदिवशीय राष्ट्रीय परिषदे ' साहित्य, समाज, व्यवसाय आणि मानवी मूल्ये ' या विषयावर मार्गदर्शन करत असताना बोलत होते. या  राष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव (उ.शि.) प्रिं. डॉ.शिवलिंग मेनकुदळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य  के.के. घाटगे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले, प्रोफेसर बिराजदार एस‌.बी. ,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड .किसन खामकर, प.पू. सुंदरगिरी महाराज, प्राचार्य डॉ.के.एम.नलवडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

आपल्या भाषणात पुढे श्री .माने म्हणाले,'एखादा उद्योग, व्यवसाय सुरू करणे आणि वाढविणे यासाठी स्वतः उद्योजकाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सतत चिकाटी बाळगून उद्योजकाला अनेक आव्हांनाला सामोरे जाण्याची आणि आपल्या ध्येयाकडे जाण्याची प्रेरणा टिकवून ठेवावी लागत असते. तसेच उद्योजकीय ज्ञान आणि कौशल्य वाढविण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण घेणेदेखील माणसाची उद्योजकीय प्रेरणा वाढविते. उद्योग क्षेत्रात आपली स्वतःची थर्माकोल मॅन म्हणून ओळख कशा प्रकारे झाली याविषयीची माहिती परिषदेत सांगितली. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणातून फक्त नोकरी न करता नोकरी देण्याचे क्षेत्र निवडले पाहिजे याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा .विकास देशमुख म्हणाले,'साहित्य, समाज, व्यवसाय आणि मानवी मूल्ये' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन महाविद्यालयाने उत्कृष्टपणे  केले आहे .तसेच  राष्ट्रीय परिषदेतील चर्चासत्रातील  सहभागी प्राध्यापक, संशोधक ,विद्यार्थी , विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

तसेच आपले प्रशासकीय अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी‌.भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.आर‌.धोंगडे व प्रा.एम.एन.आवळे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.संजय क्षीरसागर यांनी मानले .राष्ट्रीय परिषदेसाठी विविध विद्यापीठातील संशोधक,  प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.