बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सध्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागा अंतर्गत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमा अंतर्गत जलसंपदा विभागाच्या जिहे काटापुर उपसा सिंचन विभागाचा अंतर्गत खटाव तालुक्यातील नेर धरणातलगत असलेल्या शेतकऱ्यांसोबत शेतकरी संवाद या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आहे.
या शेतकरी संवाद कार्यक्रमांतर्गत गुरुवर्य कै लक्ष्मण रावजी इनामदार उपसा सिंचन योजना ( जिहे कटापूर) अंतर्गत धरणाच्या डाव्या तीरावर्ती असलेले नेहरू उपसा सिंचन योजना क्रमांक दोन च्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला,
या योजनेअंतर्गत खटाव तालुक्यातील नेर, पुसेगाव, ललगुण, राजापूर वेरणे, उंबरमळे, निढळ. कडगुण या नऊ गावांमधील एकूण ३००० हे. क्षेत्रासाठी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत निर्धारणातून पाणी उपसा करून या ९ गावातील क्षेत्रासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली द्वारे पाणी सिंचनासाठी पुरवले जाणार आहे. त्यासाठी या योजनेअंतर्गत दोन मुख्य नलिका म्हणून एक नलिका गावाकडे जात आह तसेच या मुख्य नलिका वरती असलेले वितरण प्रणाली ( वितरिका) हारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
तसेच नेर उपसा सिंचन योजना क्रमांक २ अंतर्गत पंपगृह कळयंत्र आवार, कंट्रोल रूम, इंटेक्स स्ट्रक्चर, उधवॆगामी नलिका रांग, वितरण कुंड इ. बांधकामाचा समावेश असून सध्या स्थितीतील हे बांधकाम जवळपास ९९% पूर्ण झाले आहे.
" शेतकरी संवाद" या कार्यक्रमांतर्गत वरील ९ गावातील उपस्थिती शेतकऱ्यांशी योजनेच्या कामाबाबत व योजनेतून उपलब्ध होणाऱ्या सिंचनाच्या सोयी सुविधा बाबत संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांनी योजनेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले . आमदार महेश शिंदे , जलसिंचन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. तसेच जलसंपदा विभागामार्फत उर्वरित कामही लवकर पूर्ण करून या योजनेअंतर्गत असलेल्या ९ गावांना लवकरच योजना कार्यान्वित करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजित असल्याचे सांगण्यात आले.
Social Plugin