बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक संघटनेचे कार्य उत्कृष्ट असून आपण मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा नुकताच धनंजय चोपडे यांनी पदभार स्वीकारला याबद्दल त्यांचा सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या विविध संस्था व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी चोपडे बोलत होते . यावेळी सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता .का . सूर्यवंशी, परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर, उपाध्यक्ष शहानवाज मुजावर,इकबाल मुल्ला,कार्यवाह अनंत यादव, कोषाध्यक्ष सुधाकर माने,राष्ट्रभाषानुरागी शिक्षक शिक्षिकेतर सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हणमंत सूर्यवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
चोपडे पुढे म्हणाले आपण गेले कित्येक वर्षापासून जिल्हा हिंदी अध्यक्ष मंडळाचे कार्य पाहत असून त्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि शिक्षकांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते शिक्षकांचा सन्मानही केला जातो ही आदर्शवत बाब असून प्रशासकीय पातळीवर हिंदी अध्यापक मंडळाच्या सर्व बाबींना आपण सकारात्मक पद्धतीने सहकार्य करू अशी याची ग्वाही त्यांनी दिली .
यावेळी ता .का . सूर्यवंशी म्हणाले, हिंदी अध्यापक मंडळाच्या द्वारे विविध उपक्रम चालवले जातात तसेच मंडळाच्या विविध आठ संस्थांचाही परिचय त्यांनी यावेळी करून दिला भविष्यात मंडळाच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जाणार असून या उपक्रमासाठी शिक्षण विभागाचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली .
कार्यक्रमास सहकार्यवाह नारायण शिंदे, महादेवी वर्मा हिंदी ग्रंथालय सचिव गुलाब पठाण,पतसंस्था संचालक,शेंद्रे चे मुख्याध्यापक रवींद्र सानप, मनोहर काटकर, संयुक्त हिंदी जिला प्रमुख जुबेर बोरगावकर,पतसंस्था सल्लागार संजय शिंदे,कराड तालुका उपाध्यक्ष नेताजी पाटील,सातारा तालुका अध्यक्ष नेताजी ननावरे, कोरेगाव अध्यक्ष विकास लादे,चंद्रकांत तोरडमल,शशिकांत जाधव,संतोष शिर्के, तुकाराम काळेल, अशोक नागरगोजे,संजय काटवटे , व्यवस्थापक नवनाथ शिंदे उपस्थित होते .
छायाचित्र - धनंजय चोपडे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिक्षण विभाग,जिल्हा परिषद सातारा यांचा सत्कार करताना जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता .का सूर्यवंशी, पतसंस्थेचे चेअरमन ह.रा सूर्यवंशी ,सुधाकर माने, शहानवाज मुजावर , अनंत यादव शिवाजीराव खामकर व मान्यवर





Social Plugin