Ticker

6/recent/ticker-posts

सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगामच्या निषेधार्थ अंबड शहर कडकडीत बंद



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ


 काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकावर जिहादी आतंकवाद्यांनी अत्यंत क्रूर आणि अमानवी पद्धतीने हल्ला करून त्यांचा धर्म विचारून,कलमा वाचायला लावले आणि कपडे काढून विटंबना केली व अमानुषतेचा कळस गाठला.या अत्यंत संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी अंबड शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी सर्व बाजारपेठ कडकडीत बंद होती.सर्व हिंदू समाज बांधव तसेच अंबड मधील सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करुन ज्यांनी देश विघातक कृत्य केले.अशा प्रवृत्तींना जशास तसे उत्तर द्यावे अशी जोरदार घोषणा देऊन मागणी या मोर्चा मधून करण्यात आली आहे.यावेळी मोर्चामध्ये सर्व हिंदू समाज बांधव व हिंदुत्ववादी संघटना खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.