Ticker

6/recent/ticker-posts

नवनाथ जगदाळे यांचा रयत सेवक पुरस्कार 2024 ने सन्मान



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे]

 पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल या वर्षीचा माजी प्राचार्य एन. आर. माने निष्ठावान गुणी रयतसेवक पुरस्कार व सन्मानपत्र बुध गावचे सुपुत्र व  रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज वडूथचे प्राचार्य तथा मध्य विभागाचे विभागीय अधिकारी  नवनाथ जगदाळे  यांना प्राप्त झालेला आहे.त्यांना हा पुरस्कार जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

या  यशाबद्दल जगदाळे यांचे  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी , व्हॉइस चेअरमन भगीरथ काका शिंदे ,संघटक डॉक्टर अनिल पाटील , सचिव विकास देशमुख , उच्च माध्यमिक विभागाचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे , माध्यमिकचे सहसचिव बी. एन. पवार  तसेच स्कूल कमिटी सदस्य, इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वडूथ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी अभिनंदन केले.