Ticker

6/recent/ticker-posts

बुद्ध जयंती निमित्त मोटार सायकल रॅलीचे आयोजन



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 


एकता मित्र मंडळ, राहुल नगर दारव्हा वेश, कारंजा लाड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक : 12 मे 2025 रोजी भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे

12 मे 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता मोटार सायकल रॅलीचा प्रारंभ राहुल नगर दारव्हा वेश येथून करण्यात येईल. शहरातील मंगलवारा, नगर परिषद कार्यालय, रामा सावजी चौक, दत्त मंदिर, सोनटक्के यांचे घर, सुभाष चंद्र बोस पुतळा चौक, झाशी राणी चौक बायपास, टी पॉईंट, बस स्थानक रोड ते अशोक नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जयस्थभ चौक ते नेहरू चौक ते गाडगेबाबा पुतळा ते महात्मा फुले चौक ते वीर संभाजी चौक ते दारव्हा वेश या मार्गाने रॅली काढण्यात येणार आहे व दारव्हा वेश राहुल नगर येथेच रॅलीचा समारोप करण्यात येईल

आयोजित मोटरसायकल रॅलीत शहरातील राहुल नगर, पंचशील नगर, सिद्धार्थ नगर, माळीपुरा, भीम नगर, महात्मा फुले नगर, गौतम नगर, अशोक नगर, प्रबुद्ध नगर, शिक्षक कॉलनी आधी सह कारंजा लाड शहरातील बौद्ध बांधवांनी बहुसंख्येने रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन एकता मित्र मंडळ, राहुल नगर दारव्हा वेश यांच्या वतीने करण्यात येत आहे