आदिवासी संघटनांच्या आंदोलनात व जन आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना शिवसेना शिंदे गटाचे धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगांव व ग्रामपंचायत जुगनी येथील सरपंच यांनी गुंडांमार्फत व स्वतः वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत लाथा बुक्यांनी व काठ्यांनी मारहाण करून तक्रारदारांस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी हे त्यांच्या पक्षाच्या सरपंचांमार्फत आंदोलन कर्त्यांना मारझोड करायला लावून आदिवासी बांधवांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचून गुंडशाहीने आदिवासींचा आवाज दडपण्याचे काम करत आहेत.
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनांचे पंचायत समिती धडगांव समोरील ठिय्या आंदोलनाला रोखण्यासाठी,आंदोलन दडपण्यासाठी व आंदोलनात सहभागी होऊ नयेत, म्हणून धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगांव येथील *शिवसेना शिंदे गटाचे सरपंच श्री. राज्या बाज्या पटले* यांनी ३ गुंडांमार्फत सामाजिक कार्यकर्ते तथा आंदोलन कर्ते दिलवर गोवाल पाडवी यांना गालावर व लाथा बुक्यांनी जबर मारहाण करून इमारतीच्या दुस-या मजल्यावरून खाली फेकून ठार मारण्याचा प्रयत्न केला.मोडलगांव येथील सरपंचाविरोधात धडगांव पोलीस ठाण्यात दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.
२८ एप्रिल २०२५ रोजीच्या आदिवासींच्या जन आक्रोश मोर्चात का गेला? मोर्चात शामिल झाल्याचा राग धरून ग्रामपंचायत जुगनी येथील *शिवसेना शिंदे गटाचे सरपंच श्री. राज्या थाव-या पवार* यांनी मोर्चेकरी श्री.टेंब-या शिवा वळवी वय ६२ यांना वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत काठीने मारहाण केली आहे.जुगनी येथील सरपंचाविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात दिनांक ८ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin