Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पावसाचा बळी



पालघर (ज्ञानेश चौधरी) ग्रामीण वार्ताहर

पालघर जिह्यातील वेढी गावातील रहिवाशी  मोरेश्वर लोहार हे आपल्या बकऱ्या चारण्या साठी गावच्या पश्चिम दिशेला गेले असता रात्री अवकाळी पाऊस आणि वारा या मुळे महावितरणची वीजेची तार तुटून पडली होती. सदर तार ही  मोरेश्वर लोहार यांना दिसली नाही तारेवर त्यांचा पाय पडताच तारे मध्ये असलेल्या विद्युत प्रहावा मुळे त्यांना विजेचा झटका लागून ते मृत्युमुखी पडले.

घटनास्थळी सफाळे पोलिस पोहचून पंचनामा करण्यात आला व त्यांचे पार्थिव शरीर शवविच्छेदना साठी सफाळे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. गावकऱ्यांनी महावितरणला नुकसान भरपाई देण्यासाठी मागणी केली आहे