पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 


कारंजा (लाड) दि. १४ : मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल यावर्षी ८७.०९ टक्के लागला.

या विद्यालयातून ३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २७विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ११ विद्यार्थी प्राविन्य श्रेणीत, १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ०३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणित तर ०१ विद्यार्थी उतीर्ण झाले. कु. प्रिया राजाराम इंगळे या विद्यर्थिनीने ८५.४०% गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. दर्शन विश्वनाथ ठाकरे याने ८१.२०% गुण घेऊन द्वितीय क्रमांक, कु. दिव्या ईश्वर मडामे हीने ८१% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळिवला. दिव्यानी नवनाथ डुकरे ही ८०.६०% गुण घेवून चवथी आली तर कु. नियती संतोष घोडराव व कु. वैष्णवी राजेंद्र ठाकरे हीने ८०.२०% गुण घेवून पाचवा क्रमांक प्राप्त केला. दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष योगेश केशवराव खोपे, मुख्याधापक विजय देविदास भड, शिक्षक राजेश शेंडेकर, शालिनी ओलीवकर, गोपाल काकड, अनिल हजारे, शिक्षकेत्तर कर्म देविदास काळबांडे , भालचंद्र कवाने, राजु लबडे, राजेंद्र उमाळे, राजेश लिंगाटे यांनी कौतुक केले.