Ticker

6/recent/ticker-posts

प्रशिक बँकेच्या मी सदैव पाठिशी-खा. देशमुख



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 


कारंजा(लाड ) संचालक मंडळ व व्यवस्थापिका आशा राऊत यांच्या परिश्रमाने प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था बहरली असून, तिने लोकांचा विश्वास संपादन केला आहे. या पतसंस्थेने राबवलेल्या उपक्रमाची आता जागतिक स्तरावर नोंद घेण्यात असल्याने राजकीय हेवेदावे बाजुला ठेवून अशा पतसंस्थेच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आपण स्वतः या बँकेच्या सदैव खंबीरपणे पाठिशी राहु, अशी ग्वाही खासदार संजय देशमुख यांनी दिली.

येथील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादितने १४ एप्रिल २०२५ रोजी पाच क्विंटल तांदळापासून ५० बाय ५० आकाराची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम कलाकृती साकारली होती. या कलाकृतीची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली असून, तसे पतसंस्थेला नुकतेच प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण करण्यासाठी बुद्ध१४ एप्रिल मह 50x50 फूट तो अवार्ड पौर्णिमेच्या पावनपर्वावर १२ मे रोजी स्थानिक महेश भवन येथे अवॉर्ड वितरण कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून खासदार देशमुख यांनी उपरोक्त ग्वाही दिली आहे. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष ?ड. रवींद्र रामटेके तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सईताई डहाके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती गणेशपुरे, भाजप शहर प्रमुख प्राजक्ता माहितकर, पतसंस्थेचे संचालक आशिष बंड, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता तुरक, विलास सुरळकर, शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती देवानंद देवळे आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या संचालकांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच कलाकृती साकारणारे मनोज पातूरकर यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, आमदार डहाके, भाजप शहर प्रमुख माहितकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणेशपुरे यांनी प्रशिक पतसंस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. सूत्रसंचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश लिघाटे, तर आभारप्रदर्शन पतसंस्थेचे उपाध्यक्ष आकाश कन्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे संचालक कर्मचारी अल्पबचत प्रतिनिधी आदींनी परिश्रम घेतले