मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगांव तालुक्यातील नागरिकांना करिता महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे. तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी तालुक्यात मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करणेबाबत शासनाचे निर्देश आसल्याची माहीती तहसीलदार दीपक पुंडे यांनी दिली आहे.वाशीम जिल्हाधिकारी,यांनी “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्हयास मिळणाऱ्या नियतव्ययाच्या प्रमाणात कोणताही बदल न करता महसुली क्षेत्रिय कार्यालयाकडून जनतेस सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” मालेगांव तालुक्यातील मंडळ स्तरावर आयोजित करणे, हा सातवा घटक म्हणून सन 25-26 या आर्थिक वर्षापुरता समाविष्ट करण्यास खालील अर्टीच्या अधिन राहून शासनाने मंजूरी दिलेली आहे. तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर वर्षातुन किमान चार वेळा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आले.कार्यक्रमांची अमंजबजावणी चोखपणे पार पाडावी या साठी नायब तहसिलदार अरविंद करगळे हे या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थीत होते.
यामध्ये ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता,शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी,उत्पन्न व जातीचे दाखले,रेशन कार्ड वाटप,सामाजिक लाभाच्या योजना जसे संजय गांधी निराधार योजना,पीएम किसान योजना इ महसूल विभागाशी संबंधीत विविध प्रमाणपत्रांचे वाटप, प्रमाणपत्राबाबत जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढण्यात येऊन मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करुन त्यामध्ये विविध महसूली दाखले,जनतेच्या तक्रारीचे निवारण तथा मार्गदर्शन करुन महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत.आज या कार्यक्रमासाठी महसूल कर्मचारी के एल अवचार, गजानन उमाळे,पंडित घुगे,गजानन बनाईत,अमोल भुरकाडे, सुधीर कोल्हे, वैभव नवघरे,पंकज शेवाळे, घनश्याम साठे,दिलीप ताजने, रामकृष्ण साठे, रणजित चव्हाण, अजित पखाले, जितू राऊत, देवानंद रणवीर, भागवत भुरकाडे ह्यांच्या सह मेडशी गांवचे सरपंच शेख जमीर, रणजित मेडशीकर,गोरखनाथ भागवत,प्रदीप तायडे, संतोष साठे,कैलास ढाले,छटू गौरे,दिनकर चव्हाण,मंगल धंदरे,गोपाल नागरे, प्रसाद पाठक,निशांत मेडशीकर,योगेश घुगे,अजिंक्य मेडशीकर ह्यांच्यासह परिसरातील महीला व पुरुषांची मोठया संख्येने उपस्थिती होती. शंभर पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या समस्याचे निकारण व निपटारा आजच्या ह्या महाराजस्व शिबिरात झाला.
Social Plugin