अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
परशुराम जयंती साजरी करून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शोभायात्रा प्रारंभ दि.२९-एप्रिल२०२५ मंगळवार सायं.५.०० श्री राम मंदिरापासून झाली नाथ्रेकर चौक,गणपती मंदिर,महाराष्ट्र द्वार,महात्मा फुले चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,भगवान महावीर चौक,टिळक पथ, सिद्धिविनायक मंदिर मार्गे हट्टेकर प्रांगणात समारोप झाला.
शोभायात्रा प्रमुख आकर्षण राजमाता अहिल्यादेवी यांचा सजीव देखावा भगवान परशुराम यांची भव्य प्रतिमा मंगल वाद्य पारंपारिक वेशभूषा सर्व समाज बंधू-भगिनी यांनी पारंपारिक मंगल वेशात शोभायात्रा व व्याख्यानास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. पुरुषांसाठी पांढरा कुर्ता पायजमा तसेच माता भगिनींसाठी लाल रंगाची साडी असा मंगल वेश परिधान केलेला होता.
Social Plugin