Ticker

6/recent/ticker-posts

सईताई प्रकाश दादा डहाके यांचे कार्याला अभिनंदनीय श्री ना. बावनकुळे साहेब



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

महिला आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सईताई प्रकाश डहाके ह्या विधानसभा सभागृहात किमान दोन, तीन वर्ष बोलणार नाहीत असे वाटत होते. पण त्यांनी निवडून आल्यानंतर लगेच विधिमंडळात जिल्ह्याचे तथा आपल्या विधानसभा मतदान संघाचे अनेक प्रश्न मांडले. ते खरंच अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

रिसोड येथे नुकतीच नवसंकल्प सभापार पडली. या सभेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी आमदार सईताई डहाके यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून कुठल्याही महिलेला विधिमंडळ तथा मंत्रालय शिकायला वेळ लागतो. महाराष्ट्राच्या मंडळात आल्यानंतर विधान निवडून आमदाराला आपला मतदार संघ कुठे आहे? मतदार संघाचे प्रश्न मांडावे लागतात. मला वाटले होते सईताई डहाके ह्या दोन, तीन वर्ष विधानसभा सभागृहात बोलणार नाहीत. पण, सईताई डहाके यांनी विधानसभेत ज्या पद्धतीने जिल्ह्याचे तथा आपल्या मतदार संघाचे अनेक प्रश्न मांडले ते खरोखरच अभिनंदन करण्यासारखे आहे आहे, असे ते म्हणाले. या सभेला आमदार सईताई डहाके ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.