Ticker

6/recent/ticker-posts

कंकुबाई माध्यमिक शाळेची उज्ज्वल परंपरा १९ व्या वर्षीही कायम



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 


माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत कंकुबाई कन्या शाळेने १००टक्के निकालाची परंपरा सलग १९ व्या वर्षीही कायम राखली आहे.

यावर्षी एकूण १४८ विद्यार्थिनी परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. शाळेतून ९०टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनी २३, प्राविण्य श्रेणी ७४, प्रथम श्रेणी ४६, द्वितीय श्रेणीत ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्कृत

विषयात ३ विद्यार्थिनींनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेले आहेत. विद्यालयातून ज्ञानेश्वरी गजानन उपाध्ये ९७.४० टक्के, तनुष्का संजय देशमुख ९७. २० टक्के, अनुष्का संजय निकडे ९६.८० टक्के, शिवानी गोपाल गावंडे ९६ टक्के, निधी निलेश घुडे हिने ९५. ४० टक्के असे गुण संपादन केले. सर्व विद्यार्थिनींचे कंकुबाई परिवारातर्फ कौतुक करण्यात आले आहे