*खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी व सचिव रवींद्र चौधरी अधिवेशनात सन्मानित*
प्रतिनिधी :- रामेश्वर तोंडे लोणीगवळी
धुळे - महाराष्ट्रातील तेली समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवार,दिनांक ११ मे रोजी संत नगरी शेगाव जिल्हा बुलढाणा येथील अग्रसेन भवन येथे संपन्न झाले.श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी नागपूर पूर्वचे आमदार श्रीकृष्णाजी खोपडे उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार सुरेशजी वाघमारे,ईश्वरजी बाबूळदे, सत्यनारायण साहू नेपाळ,रजनीश गुप्ता दिल्ली,उमेश साहू नागपूर,संताजी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष सुभाषजी घाटे,खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,सचिव रवींद्र जयराम चौधरी,उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी,शरद तेली,सौ.संगीताताई चौधरी सुरत,भरत खोब्रागडे,संजय ढोबळे,पत्रकार सुषमा राऊत बुलढाणा,गायक राज रायते बीड यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांचा अधिवेशनात सत्कार करण्यात आला .श्री संताजी महाराजांची मूर्ती,सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देऊन आमदार कृष्णाजी खोपडे,माजी खासदार सुरेशजी वाघमारे व सुभाषजी घाटे आदी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
अधिवेशनात आमदार श्री कृष्णाजी खोपडे,माजी खासदार सुरेशजी वाघमारे यांच्या सह अनेक मान्यवरांनी समाज विकासासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.अधिवेशनात समाज विकासासाठी अनेक मागण्यांचा ठराव या अधिवेशनात मांडण्यात आला.हे ठराव विधानसभेमध्ये मांडण्यात येऊन या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आमदार श्री कृष्णाजी खोपडे यांनी दिले.यावेळी महाराष्ट्र राज्य व राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक समाजसेवक बंधू-भगिनी उपस्थित होते.नागपूर ,भंडारा, चंद्रपूर, अकोला, धुळे, जळगाव ,वाशिम ,संभाजीनगर,मुंबई,नाशिक,वर्धा,बुलढाणा आदी जिल्ह्यांतून समाजसेवक बंधू-भगिनी उपस्थित होते.
सदर अधिवेशनात धुळे जिल्ह्यातून खान्देश तेली समाज मंडळाचे पदाधिकारी धुळे शहराचे उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,उपाध्यक्ष किशोर पुंडलिक चौधरी,धुळे तालुका अध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी,चोपडा तालुका अध्यक्ष प्रकाश शंकर चौधरी,जामनेर तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी,शेंदुर्णी शहर अध्यक्ष सोपान पांडुरंग चौधरी यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Social Plugin