Ticker

6/recent/ticker-posts

खातगुण सोसायटीच्या नूतन सहकार भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा 13 मे रोजी


 

बुध  दि. [प्रकाश राजेघाटगे ] 

खातगुण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सहकार भवन नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवार दि . 13 मे रोजी दुपारी 4 वाजता  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष , खासदार श्री नितीन काका लक्ष्मणराव पाटील व  आमदार  शशिकांत  शिंदे  यांचे शुभ हस्ते घेण्यात येणार आहे. 

       विविध कार्यकारी सोसायटी सहकार भवन या इमारतीच्या बांधकामासाठी मुख्य प्रवर्तक श्री वसंत कृष्णा जाधव गुरुजी यांचे मार्गदर्शनाने तसेच माजी चेअरमन विजय लावंड यांचे विशेष प्रयत्नाने सोसायटीचे आजी-माजी चेअरमन व सदस्य यांच्या सहकार्याने साकारलेल्या सहकार भवन या सोसायटीच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती  जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मा.आमदार व जिल्हा बँकेचे सदस्य प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे सीईओ राजेंद्र सरकाळे हे उपस्थित राहणार आहेत. 

याखेरीज विशेष उपस्थिती दाजी खताळ, घनश्याम सावंत, श्रीमती दिपाली सावंत, शामराव भोसले, मुसा शेख, आनंदराव लावंड, पांडुरंग जाधव, आनंदराव भोसले, अशोक लावंड, सौ कल्याणी पवार, रामदास लावंड, प्रमोद भोसले, या संस्थेच्या सोसायटीच्या सहकार भवन बांधकामासाठी खास सहकार्य व योगदान दिले असे मुख्य प्रवर्तक वसंत जाधव गुरुजी, मा.चेअरमन विजय मानसिंग लावंड, विद्यमान चेअरमन नानासो लावंड, व्हॉइस चेअरमन विठ्ठल पवार व सर्व संचालक उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असणार आहेत. दि. 13 मे रोजी सायंकाळी 4 वाजता सहकार भवन या इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.