मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : शहरातील विविध बौद्ध विहार व सार्वजनिक ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे.
शहराच्या पूर्व भागातील पंचशील नगर येथील तक्षशिला बुद्ध विहारात जेथे उद्या बुध्द प्रतिरूप बिंबाचे अनावरण होत आहे तेथे सुधाकर पखाले यांच्या हस्ते व पि एस आय शिल्पा विठ्ठल लोढे यांच्या उपस्थितीत धम्म रश्मी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. तर विहारात प्रितम चंद्रकांत लोंढे, मुखनंदन तांबारे, धम्मकीर्ती घनबहादूर, लिलाधर चक्रनारायण, व्हि के खिल्लारे, राहुल तायडे, रमेश तायडे, कराटे प्रशिक्षक देवानंद वैद्य व इतर मान्यवरांनी भगवान बुध्द, अम्राट अशोक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुष्प,धूप,हार अर्पण करून बौध्दाचर्य रंजन घुगे, कैलास भीवाजी इंगळे यांनी पूजा पाठ व वंदना घेतली.
तर शहरातील जून्या वस्तितील पंचशील बुद्ध विहारात भाऊराव पखाले, राजू पखाले, ललिता पखाले, मनोरमा पखाले, सिंधू खरात विनोद गायकवाड यांनी तथागतांचे पूजन केले. बौध्दाचार्य दीपक घुगे यांनी त्रिशरण अष्ठशील प्रदान करून वंदना घेतली. नवीन बसस्थानक नजीकच्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो नजीक, तहसील मागील अशोक नगर व जून्या पंचायत समिती नजीकच्या फोटो जवळ बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला.
ही बुद्ध पौर्णीमा, त्रिविध वैशाख पौर्णीमा, बुद्ध जयंती, निर्वाण दिन,महापरिनिर्वाण दिन , बुद्धाब्द-2569 , बौध्दांचे नववर्ष दिन [12 मे 2025 ] प्रारंभ म्हणून ओळखली जाते.सिद्धार्थाचा जन्म , बुद्धांची सम्यक सम्बोधि , आणि तथागतांचे महापरिनिर्वाण ज्या एकाच पौर्णिमेला झाले त्या वैशाख पौर्णिमेच्या म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
Social Plugin