Ticker

6/recent/ticker-posts

' योगीकथा 'चे शनिवारी प्रकाशन



 मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

ता 13 - योगीकथा पुस्तकाचे प्रकाशन ता 17 मे रोजी सायंकाळी 6. 30 करण्यात येणार आहे मालेगाव केळी रस्त्यावरील गाभणे यांच्या मळ्या मध्ये हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे या पुस्तकाचे लेखक प्रा अरविंद गाभणे आहेत पुस्तकं प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक,स्तंभ लेखक तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ कैलास कमोद राहणार आहेत त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा अनुप धोत्रे, आमदार अमित झनक, आमदार शाम खोडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे माजी खासदार अनंतराव देशमुख विधानपरिषद सदस्यां भावनाताई गवळी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी माजी आमदार तथा अग्रोव्हिजनचे संचालक एड विजयराव जाधव माजी आमदार बळीराम सिरस्कार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीपराव जाधव जि प सदस्य डॉ शाम गाभणे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे वाशिम नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायणराव जाधव चित्रपट निर्माते शत्रुघ्न बिडकर सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक सतीश जामोदकर परमपूज्य पवन महाराज, महंत शंकर गिरी महाराज, परमपूज्य मांजरे महाराज (विलास ताजने महाराज ), डॉ सुनील लाड, डॉ विजय कानडे, डॉ नितीन डोईफोडे, सौं मंगला कमोद, वैशाली प्रकाशन पुणे चे विलास पोतदार उपस्थित राहणार आहेत या समारंभात या पुस्तकाचे कथानायक स्व तुळजाराम गाभणे यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात येणार आहे या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुस्तकं प्रकाशन समितीच्या वतीने करण्यात आले आहे