बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
शैक्षणिक गुणवत्तेबाबत आघाडीवर असलेल्या पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सेवागिरी विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम जोमात सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी या विद्यालयात शिक्षण घेतलेल्या सन १९९६-९७ च्या बॅचच्या वतीने सहभाग म्हणून ३९ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
विद्यालयात या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्तानेविद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी. सावंत यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी संतोष सुतार, दीपक जाधव, रामचंद्र जाधव, सचिन जाधव, योगेश देवकर, शहाजी देवकर, दीपक फडतरे, प्रशांत चव्हाण, रवींद्र विधाते, दत्तात्रय फडतरे, दत्तात्रय वाघ या माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान, विद्यालयाचा कायापालट व नावलौकिक वाढविण्यासाठी येथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत उच्च पदावर काम करत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनीआणि ग्रामस्थांनी देणगी स्वरूपात मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे, तरच सर्वांच्या मदतीतून लवकरच सुविधायुक्त सुसज्ज इमारत उभी राहणार राहील, असे मत मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांनी व्यक्त केले.
Social Plugin