बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात येतो. याही वर्षी मौ. चिटमोगरा ता. बिलोली जि. नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक बावणे होते.या शैक्षणिक साहित्याचे वाटप चळवळीतील कार्यकर्ते इंद्रजीत डुमणे व मुस्तफा पटेल कुंचेलीकर यांच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक बावणे, बहुजन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गायकांबळे, संतोष खरकाडे, महेश पाटील, स्वामी मॅडम, झुंजारे सर, सरपंच आकाश कोकणे ,उपसरपंच नागसेन जिगळेकर, फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच चे सचिव सुनील कांबळे ,फुले शाहु आंबेडकर क्रांती मंच उपाध्यक्ष गौस भाई शेख, रिपब्लिकन पार्टी व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे, निळकंठ तरटे, दीपक कांबळे,खाजाभाई शेख, शेषराव गावंडे,साहेबराव डुमणे, जयदीप कांबळे, नितीन कांबळे, श्रीकांत गायकवाड, नागनाथ शेळके, राहुल गायकवाड रातोळीकर, वाघमारे शेळगावकर, जाधव यासह अनेक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
Social Plugin