Ticker

6/recent/ticker-posts

हाणमंतराव माली पाटील यांचे निधन



●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपुरकर: 

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापतीहाणमंतराव माणिकराव माली पाटील (६१) यांचे बुधवार दि.१८ जून रोजी राञी आठ वाजता दुखःद निधन झाले.राजकीय,सामाजिक क्षेञात ते परखड व्यक्तिमत्त्व म्हणून सदैव अग्रेसर होते.त्यांच्या पार्थिवावर गुरूवार दि.१९ जून रोजी दुपारी २ वाजता मळ्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन विवाहित मुली,जावई,भाऊ,भावजय,पुतणे,बहिणी, भावोजी, नात,नातू असा मोठा परिवार आहे.बाबू मालीपाटील, विद्यमान उपसरपंच शंकरराव मालीपाटील,गणेश मालीपाटील यांचे ते बंधू होत.