Ticker

6/recent/ticker-posts

भविष्यातील आव्हाने पेलणारा विद्यार्थी घडवा- श्री चंद्रकांत दळवी



 बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुजनांचे स्थान श्रेष्ठ असते. शालेय जीवनात मिळालेले आदर्श गुरुजन समाजासाठी आदर्श विद्यार्थी घडवत असतात.आदर्श विद्यार्थी व आदर्श गुरुजन ही समाजाची खरी श्रीमंती असते  खरा शिक्षक कधी सेवेतून निवृत्त होत नसतो.तो सतत समाज उन्नतीचे कार्य करण्यात मग्न असतो. स्पर्धेच्या या प्रचंड युगात भविष्यातील आव्हाने पेलणारा विद्यार्थी घडण्याकरता सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.असे विचार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन  चंद्रकांत दळवी साहेब यांनी निढळ  येथे आयोजित श्री विजय मधुकर गुरव( गुरुजी )यांच्या सेवानिवृत्ती समारंभात व्यक्त केले.

 यावेळी  श्री गुरव यांचा  मान्यवरांच्या  शुभहस्ते  सपत्नीक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रा.शिक्षक समितीचे राज्य नेते  श्री उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, माजी चेअरमन नवनाथ जाधव, आबासाहेब जाधव, विशाल कणसे, नितीन घनवट,  विठ्ठल फडतरे,  एस. के जाधव,  प्रल्हाद कुचेकर, श्री अण्णा गुरव ,श्री दिडके गुरुजी,श्री वैभव जगताप,श्री विजय गोरे,श्री कवितके गुरुजी, श्री गोसावी साहेब,श्री नलवडे गुरुजी, श्री शेलार गुरुजी, गुरव समाज संघटना जिल्हाध्यक्ष  श्री नानासाहेब गुरव, श्री मधुकर गुरव, किसनराव गुरव, डॉ. विश्वनाथ भांडवलकर, श्री विनोद शिर्के, सौ आराधना गुरव,सौ पूजा गुरव, सौ शुभांगी गुरव, पारायण मंडळ निढळ, आर्ट ऑफ लिविंगचे सदस्य, सज्जनगडचे  पाटील महाराज,ग्रामस्थ व आजी-माजी गुरुजन वर्ग व प्राथमिक शिक्षक समितीचे मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनाथ जाधव यांनी प्रस्ताविक केले. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले.प्राचार्य  जगदीश निर्मळ यांनी आभार प्रदर्शन केले.