प्रतिनिधी @समाधान भुतेक ईसरूळ
चिखली ते देऊळगाव राजा या राज्य महामार्गावर मेहकर फाटा (चिखली जवळ) येथे चिखली पोलिस स्टेशनचे ट्रॅफिक पोलिस हे वाहतूक नियमांवर कारवाई करताना सर्वसामान्य स्थानिकांना थांबवत असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. मात्र याच ठिकाणी सर्रासपणे वाळू वाहतूक करणारे ट्रक बिनधास्तपणे जाताना दिसत आहेत. या अवैध वाहतुकीकडे डोळेझाक होत असल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, सामान्य जनतेला थांबवायचे आणि वाळू माफियांना मोकळे सोडायचे – हा कायदा कुणासाठी? हे उघडपणे दिसणारे दुहेरी न्यायधोरण आणि दृष्ट लागलेले पोलिस यंत्रणा यामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होतो.या प्रकारामुळे जिल्हाधिकारी यांच्यावरही संशयाचे सावट आहे. नागरिक विचारत आहेत की, या भ्रष्ट व्यवस्थेला जबाबदार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील का? की मग बुलडाण्याचे जिल्हाधिकारी जबाबदार आहेत?जर जिल्ह्यातच कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच भेदभाव केला जात असेल, तर मग लोकांनी तुमच् श्राद्ध का घालू नये? असा थेट सवाल विचारतआहेत.
सध्या ही परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी तातडीने या भ्रष्ट कारभाराची दखल घ्यावी, संबंधित पोलिसांवर कारवाई करावी आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई करून जनतेला उत्तर द्यावे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी फेसबुक वर केलेली पोस्ट जिल्हाधिकारी यांना आत्मचिंतन करायला लावणारी
Social Plugin