सुरगाणा । कृष्णा पवार
सुरगाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची काठीपाडा येथे जिल्हा उपाध्यक्ष चिंतामण गावित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुरगाणा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
तालुकाध्यक्षपदी रणजित गावित तर कार्याध्यपदी रघुनाथ जाधव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी किसन पवार, परसराम थोरात व यशवंत राऊत यांची निवड करण्यात आली. बैठकीत जिल्हा मजूर संघांचे चेअरमन राजेंद्र गावित, अमृत महाले, मुकेश महाले, वसंत पवार, निलेश भोये, दिलीप राठोड, तुळशीराम गावित, रामचंद्र पवार, शिवाजी चौधरी, सुरेश जाधव, राहुल भोये, विलास गांगोडा, भरत बंगाळ, गितेश वळवी, योगेश चौधरी, गणेश गावित, यशवंत चौधरी, हिरामण भोये आदी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाची पुढील रणनीतीच्या दृष्टीने सदरची निवड हि आगामी स्थानिक स्वराज्य संथ्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे. पक्षाला नवीन उभारी देण्याचसाठी नवीन कार्यकारणी काम करेल व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांना पक्ष फुटीनंतर पवार साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलो तसेच नवीन कार्यरणी देखील पवार यांच्या विचारांशी तालुक्यात जोमाने काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जि.प., पं. स. निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.
Social Plugin