Ticker

6/recent/ticker-posts

मेडशीत 'स्मार्ट मीटर' बसविण्यास गावकऱ्यांचा तीव्र विरोध



मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले

वीज महावितरण कंपनीने राज्यातील सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर सादर करणार असल्याची घोषणा केली आहे,तसेच ही मीटर्स कंपनीच्या खर्चाने लावणार अशी खोटी व दिशाभूल करणारी जाहिरात करण्यात आली आहे.वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू झाली आहे. मात्र मेडशी येथून स्मार्ट मीटर बसविण्यास गावकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे.ग्राहकांना धाकदपट,भीती दाखवून आपले मीटर फॉल्टी, नादुरुस्त आहे व ते बदलून घ्या अशी खोटी माहिती प्रसिध्द करून स्मार्ट मीटर बसवण्याचे षडयंत्र गावात सुरु आहे.

मेडशी येथे हे स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांच्या संमतीशिवाय हे स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही खाजगी कंपनीचे कर्मचारी गोरगरीब झोपडपट्टीतील रहिवाशी,भूमिहीन वीज ग्राहकांच्या घरी सक्तीने मीटर बसवत आहे.येथे आज पर्यंत गोरगरीब नागरिकांना धाक दाखवून शेकडो स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लागणार नाही असे आदेश दिले होते.त्या आदेशाला झुगारून जनतेची खूप मोठी फसवणूक वीज वितरण कंपनीच्या वतीने होत आहे. सदर स्मार्ट मीटरची किंमतसुद्धा जास्त आहे. ही किंमत वीजबिलात लावून वसूल केली जाणार आहे.त्यामुळे 

मेडशी मधील वीज ग्राहकांनी आपल्या घरी कोणत्याच परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवू नये असे आव्हाहन मेडशीचे सरपंच शेख जमीर यांनी गावकऱ्यांना केले असून यावरून येत्या काळात प्रीपेड मीटरला सार्वत्रिक स्तरावर तीव्र विरोध होण्याचे संकेत मिळत आहेत.


नविन स्मार्ट मीटर मेडशीत बसवत असून आपल्याला जो पर्यंत शासन निर्णय किंवा ग्राम पंचयात ना हरकत दाखवत नाही स्मार्ट मीटर बसवू नका -शेख जमीर सरपंच मेडशी