सिंदखेडराजा - ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा -येथुन १४ जुन २०२५ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ३५१व्या पुण्यतिथीनिमित्ताने सिंदखेडराजा येथून पाचाड (किल्ले रायगड) येथील समाधीस्थळाकडे जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचा भव्य शुभारंभ सकाळी १० वाजता करण्यात आला. यदुकुलभूषण राजे लखुजीराव जाधवराव प्रतिष्ठान आणि लखुजीराजेंच्या वंशजांच्या वतीने या पवित्र स्मृतियात्रेचे आयोजन करण्यात आले होतेया रथयात्रेची सुरुवात सिंदखेडराजा येथील माँ जिजाऊ यांच्या पूजनाने झाली. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन झाल्यानंतर यात्रेचे विधिवत प्रस्थान करण्यात आले.
या प्रसंगी राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज भागवत राजे जाधव, नरसिंग नारायण जाधव, प्रभाकर राजे जाधव, गोपाल राजे जाधव, आनंद राजे जाधव, डॉ श्रीकांत राजे जाधव,प्रशांत राजे जाधव, अतिश राजे जाधव, रामभाऊ राजे जाधव, कार्तिक राजे जाधव, ऋषी राजे जाधव आदींसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांमध्ये: आ मनोज कायंदे मा.आमदार तोताराम कायंदे,मा आमदार शशिकांत खेडकर,अमित राजे शिर्के,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी,भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ,मा नगराध्यक्ष सतीश तायडे, देविदास ठाकरे मा नगराध्यक्ष, भाजपा शहराध्यक्ष ॲड.संदीप मेहेत्रे,ता. अध्यक्ष रा. काँ. प. राजू अंभोरे, ओमप्रकाश महाराज,स्वप्नील मोरे, ऋषिकेश काटे, चंद्रकांत काटे, कृष्णा काटे आकाश सुपेकर,आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता.
चार दिवसांची रथयात्रा – ऐतिहासिक मार्ग
ही स्मृतिज्योत रथयात्रा चार दिवस चालणार असून, तिचा प्रवास जालना, बीड, पाटोदा, कर्जत, बारामती, महाबळेश्वर, प्रतापगड, महाड मार्गे पाचाड (रायगड) येथे संपन्न होणार आहे.
प्रथम मुक्काम: बीड द्वितीय मुक्काम: भुईंज (सातारा) तृतीय मुक्काम: महाड (रायगड)
१७ जून रोजी जलाभिषेकाने समारोप
१७ जून रोजी पाचाड येथे सिंदखेडराजा येथील पाच विहिरींच्या जलाने जिजाऊ समाधीस्थळी जलाभिषेक करून यात्रेचा समारोप केला जाईल. ही यात्रा केवळ सांस्कृतिक नाही तर राष्ट्रमातेच्या कार्याचा जागर करत भाविकांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.सकल मराठा समाज, शिवभक्त, युवावर्ग यांचा या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून, यदुकुलभूषण प्रतिष्ठानने संपूर्ण संयोजनाची जबाबदारी पार पाडली आहे.
Social Plugin