Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त ग्राहक प्रबोधन सभा संपन्न



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मेडशी दि:13/06/2024 रोजी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त मेडशी येथे ग्राहक प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सहकारातून समृद्धी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या वेळी बँकेचे उपमुख्याधिकारी श्री के. जी. बिसकुंदे (तालुका प्रमुख मालेगाव) यांनी केले, बँकेचे पीक कर्ज,सोलर कर्ज, विहीर बांधकाम कर्ज, पाइपलाइन कर्ज आदी सुविधेंचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्या वतीने त्यांच्या कडून करण्यात आले. तसेच त्यांनी बँकेच्या विविध ठेवी व कर्जांच्या योजनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर कु.आर.डी. ठाकरे पालक शाखाधिकारी मालेगाव यांनी बँकेच्या विविध डिजिटल सुविधेंबद्दल माहिती दिली, जसे एटीएम, एन इ एफ टी, आर टी जी एस व एटीएम हाताळताना घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती दिली. 

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री.दिलीपराव जाधव, संचालक, दि अकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तर प्रमुख उपस्थिती शे.गणीभाई शे.चांदभाई बागवान होते, यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री शे.जमीर भाई शे.गणीभाई सरपंच, मेडशी श्री ज्ञानदेवराव साठे अध्यक्ष तंटामुक्ती, मेडशी श्री शौकत पठाण माजी तंटामुक्ती अध्यक्ष मेडशी श्री पुंडलिकराव पांडे उपाध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी मेडशी श्री गजाननराव शिंदे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री झनकराव नप्ते अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी भौरद, श्री प्रदीपराव तायडे माजी पंचायत समिती सदस्य,सौ प्रियाताई पाठक अध्यक्ष नवदुर्गा बहुउद्देशीय महिला बचत गट, श्री आत्मारामजी धंदरे माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री प्रकाशराव सानप अध्यक्ष सेवा सह सोसायटी ब्राह्मणवाडा, श्री पुंजाजीराव वाघ अध्यक्ष सेवा सोसा पांगराबंदी, श्री शिवरामजी शेंडे सदस्य सेवा सहकारी सोसायटी मेडशी होते. श्री नारायणरावजी घुगे अध्यक्ष ग्रामसेवक संघटना यांचा मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक म्हणून पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल, या कार्यक्रमात त्याचाही श्री दिलीप रावजी जाधव संचालक यांचे हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच यावेळी बँकेचे ठेवीदार तथा खातेदार यांचे सहित सलग्नित गावातील सेवा सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, सदस्य भागधारक, बँकेचे ग्राहक, व्यापारी, कर्जदार सभासद, ठेवीदार,शेतकरी आदिंची शेकडोच्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी सर्वांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जितेंद्र खंडारे शाखाधिकारी मेडशी यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रवीण वराडे बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 यांनी केले.यावेळी शाखेचे सर्व कर्मचारी तसेच सर्व निरीक्षक व गटसचिव उपस्थित होते.