Ticker

6/recent/ticker-posts

रांजणपाड्यातील घटना! प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रियसीची आत्महत्या


 

अलिबाग (रत्नाकर पाटील)

अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा येथील तरुणीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रियकराला सोमवारी (दि.23) सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताडवागळे येथील वृषभ गजानन मांडवकर (25) असे या आरोपीचे नाव आहे. त्याचे रांजणपाडा येथील 19 वर्षीय तरुणीसोबत गेल्या दीड वर्षापासून प्रेम होते. मात्र, आरोपी तिला वारंवार शिवीगाळ करणे, मानसिक व शारीरिक त्रास देत होता. त्याच्या जाचाला कंटाळून 14 जून रोजी सायंकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी प्रियकराविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने 23जूनला सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास प्रियकराला ताब्यात घेऊन अटक केली.