बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कृषि विषज्ञान केंद्र, कालवडे, ता. कराड, जि. सातारा तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग , महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 सातारा जिल्हा मध्ये होणार आहे याचाच एक भाग म्हणून खटाव गावामध्ये कोरेगावचे आमदार श्री. महेश शिंदे अभियान मध्ये सहभाग झाले व उपस्थित शेतकरी व अधिकारी यांना मार्गदर्शन केले यामध्ये ते म्हणाले सर्व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधव यांनी घ्यावा व शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करावे.
तसेच वाढत्या सोयाबीन क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण वापर व शोध लावून सोयाबीन शेती अधिक किफायतशीर करावी असे आवाहन उपस्थित शेतकरी व कृषि शास्त्रज्ञ यांना केले या वेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषद चे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांतकुमार, डॉ. आर. एन. सिंग ,शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ ,चे प्राध्यापक डॉ .विकास कारंडे , कृषी संशोधन केंद्र, कराड चे शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत कांबळे, तालुका कृषी अधिकारी खटाव श्री. विक्रम वाघमोडे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर, श्री. निलेश थोरात, श्री . विशाल महाजन, डॉ. दिलीप घोंगडे,तसेच तंत्रज्ञान साहाय्यक श्री पवन जोशी, सौ .शुभप्रधा मोहिते, आत्मा विभाग, खटाव चे तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. गणेश खिलारे हे उपस्थित होते. सर्व उपस्थित अधिकारी यांनी शासकीय योजनांची व कृषि तंत्रज्ञान याची माहिती उपस्थित सर्व शेतकरी बांधव यांना दिली
अश्या कार्यक्रम मध्ये उस्फुर्त भाग घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कालवडे चे विश्वस्त श्री. गौरीशंकर कल्याणी व सौ. रोहिणी कल्याणी यांनी केले
Social Plugin