*अंबड तालुका कार्यकारणी नियुक्ती करत पत्रकारांच्या अडीअडचणी बाबत विचार मंथन*
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
"राष्ट्रसेवा प्रमोधर्म,वतन की रक्षा आपने कलम से" या तत्त्वाने संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने अंबड येथील मातोश्री कृषी पर्यटन केंद्र लालवाडी येथे आढावा बैठक दिनांक 13 जुलै रोजी संपन्न झाली.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करत आढावा बैठकीस प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी अंबड तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच अंबड तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकारांविषयी शासन दरबारी असणारी उदासीनता,प्रसंगी जीव धोक्यात घालून समाजातील अनिष्ट रूढी,भ्रष्टाचाराबाबत,शासकीय दिरंगाईबाबत,गोरगरीब जनतेला न्याय देत वृत्तांकन करत असताना येणाऱ्या अडचणी बाबत उपस्थित पत्रकार बांधवांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आदर्श पत्रकारांनी याप्रसंगी मार्गदर्शन करत अनुभवाचे बोल व्यक्त केले.
पत्रकार संरक्षण समिती अंबड तालुका कार्यकारणी याप्रसंगी घोषित करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या आढावा बैठक प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे जालना जिल्हा अध्यक्ष अशोक गाढे, जालना शहराध्यक्ष मतीन शेख,दैनिक किसानचे पत्रकार अशपाक शाह,आदर्श अभ्यासू पत्रकार सोहेलजी चाऊस,झहीर शेख,संजय उपाध्ये, इमरान सय्यद,धर्मराज बाबर,मातोश्री कृषी पर्यटन केंद्राचे संचालक उगले यांच्या हस्ते अंबड तालुका कार्यकारणीतील तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके, तालुका उपाध्यक्ष इम्तियाज मणियार,तालुका सचिव गणेश सपकाळ सर,तालुका विधीतज्ञ एडवोकेट कृष्णा शर्मा,तालुका कोषाध्यक्ष बाळासाहेब गावडे,तालुका सल्लागार गजानन पुरी, तालुका सहसचिव फकीर बागवान यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.तर सदस्य म्हणून आकाश जळके,गणेश जाधव,सोहेल भाई चाऊस, गीताराम मते,सुरेश खरात,अशपाक शहा,भरतजी टकले,गणेश पाटोळे,अनिल भालेकर सर,धर्मराज बाबर,सुभाष जिगे सर,बाबासाहेब गोन्टे सर, फिरोज शेख,राजेंद्र गायकवाड,संजय उपाध्ये,माऊली दुबाले,सिद्धेश्वर उबाळे,संजय कोल्हे,फारुख भाई शेख,गोविंद खरात,नजीम शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पत्रकार संरक्षण समिती अंबड कार्यकारणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताचे व संरक्षणाचे कार्य करण्याबरोबरच गोरगरीब जनतेला न्याय देत शासन दरबाराची उदासीनता व ढिसाळ कारभाराबाबत प्रामुख्याने कार्य केले जाणार असल्याचे नमूद केले.
अंबड तालुका कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद पत्रे, जिल्हाध्यक्ष अशोक गाढे यांनी विशेष अभिनंदन करत सदिच्छा दिल्या आहेत...
Social Plugin