नाशिक प्रतिनिधी अमन शेख.
शाळा महाविद्यालयांमध्ये नेहमीच दैनंदिन आयुष्याचे धडे दिले जातात तर कुठे पुस्तकी धडे शिकवले जातात कोणी कौशल्य कोणी कला कुणी विज्ञान तर कोणी इतर विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात आणि त्या विद्यार्थ्यांना त्या शाळेत मिळालेली शिकवण हे त्यांच्या आयुष्यात कशी उपयोगी पडेल हे त्यांना शिकवले जातात त्या गोष्टींचा अनुभव त्यांना दिला जातो त्या गोष्टींमध्ये कसे वापरायचे कसे वागायचे कसे राहायचे हे सर्व ज्ञान या विद्यार्थ्यांना या या लहान मुलांना दिले जाते जेणेकरून काही सामाजिक धोरण किंवा इतिहास किंवा विज्ञान कुठल्याही परिस्थितीशी निगडित विषय त्यांच्या आयुष्यात कुठेही त्यांच्यासमोर आला तर ते त्या गोष्टीसाठी नेहमी तत्पर असतात जागरूक असतात अशाच प्रकारे प्रत्येक शाळेत वेगवेगळी शिक्षण नीती अवलंबली जाते कोणत्या शाळेत कुठले कायदे तर कोणत्या शाळेत एखाद्या अभ्यासावर भर दिला जातो त्याच प्रकारे नाशिक येथील नवरचना विद्यालयात आगळीवेगळी आणि नेहमी चालत असणारी ही प्रथा पार पडली म्हणजेच निवडणूक , निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असली पाहिजे त्या प्रक्रियेचा अनुभव त्या व्यक्तीला असलाच पाहिजे आणि म्हणून या गोष्टी या संधी या मुलांच्या आयुष्यात कधी येतील हे ठरलेले आहे आणि त्यासाठीचे शिक्षण आज या शाळेतून बघायला मिळाले.
नवरचना विद्यालय माध्यमिक येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता शालेय पंतप्रधान व उपपंतप्रधान पदासाठी शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. इयत्ता आठवीतील श्रेया विसपुते हिची पंतप्रधानपदी तर आदित्य गिरासे याची उपपंतप्रधानपदी निवड झाली आली.पारदर्शी मतदानातून लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागातून अनुभवली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा कुलकर्णी पर्यवेक्षक श्री विजय जाधव संस्था सहसचिव श्री पंकज पवार श्री पुरुषोत्तम ठोके, तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते यामध्ये विद्यार्थ्यांनी निवडणुकीची सर्व प्रक्रिया जवळून जाणून घेतली. उमेदवारी अर्ज भरणे, उमेदवारांची मुलाखत, त्यामधून निवडले जाणारे उमेदवार, उमेदवारी घोषित, चार दिवस प्रचार, दोन दिवस आचारसंहिता, निवडणूक, आणि निकाल,सोमवारी दिनांक 14जुलै 2025 सर्वे उमेदवार यांचे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आणि त्यांचा शपथविधी होणार आहे.
हा सर्व अनुभव ह्या मुलांच्या आयुष्यात अनुभव घेऊन जाईल आणि त्यांच्या भविष्यात त्यांना या प्रक्रियेला भीती वाटणार नाही ते या प्रक्रियेसाठी सक्षम असतील असे विद्यार्थी या शाळेने आज घडवले. तर ते अशाच प्रकारच्या मोहीम नेहमीच शाळेत राबवण्यात असे देखील बोलले आणि समाजाच्या प्रगतीसाठी मुलांना सक्षम करणे हेच आमचे धोरण आहे असे या शाळेतून लक्षात आले.
Social Plugin