Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे महानायक वसंतरावजी नाईक साहेबांचा जन्माेत्सव माेठ्या उत्साहात साजरा.



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 


कारंजा येथे हरितक्रांतीचे प्रणेते,महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या ११२ व्या जयंतीचा कार्यक्रम १ जुलै २०२५ ला महानायक वसंतरावजी नाईक सामाजीक सभागृह बंजारा काँलनी कारंजा येथे संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरूवात सभागृहापासुन माेटर सायकल रँलीने कारंजा शहरामधुन एस टी स्टँड जवळील महानायक वसंतरावजी नाईक चाैक य ठिकाणी महानायकाच्या फलकांना हार अर्पण करून डाँ.बाबासाहेब आंबेडकर चाैक या ठिकानी डाँ.बाबसाहेबाच्या परतीमेला हारार्पण करून पुढे शिवाजी चाैकात छ.शिवाजी महाराजांच्या प्रतीमेला हारार्पण करून पुढे झाशी राणी चाैकवरून पुढे मानाेरा राेडवरील संत सेवालाल महाराज स्थळाला भेट देवुन ध्वजाचे पुजन करून पुढे सभागृहाकडे रँलीचे समाराेप झाले या रँलीत बहुसंख्य समाज बांधव आपली माेटर सायकल घेवुन सहभाग नाेंदविला हाेता.

सभागृह समाेरील प्रांगणात मा.श्री दत्तराजजी डहाके माजी नगराध्यक्ष, मा.श्री जयकिसनभाऊ राठाेड माजी समाजकल्याण सभापती जि.प.वाशिम,मा.प्राचार्य डाँ.श्री गणपतरावजी राठाेड लातुर,मा.श्री अनिलभाऊ राठाेड व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले त्यानंतर सभागृहात जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कारंजा तांड्याचे नायक श्री भिकासिंगजी राठाेड,प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री दत्तराजजी डहाके माजी नगराध्यक्ष,मा.श्री जयकिसनभाऊ राठाेड माजी सभापती जि.प.वाशिम,श्री शालिग्रामजी राठाेड,मा.प्राचार्य डाँ.श्री गणपतरावजी राठाेड लातुर जेष्ठ साहित्तीक व व्याख्याते,प्रा.श्री अनिलभाऊ राठाेड वाशिम-गाेरसेना प्रमुख,श्री हिरासिंगजी राठाेड कसारखेड,श्री माेहन राठाेड माजी जि.प.सदस्य,श्री हिरासिंगभाऊ राठाेड माजी ठाणेदार,प्रा.विलासभाऊ राठाेड राष्ट्रीय अध्यक्ष,श्री हंसराजजी शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष समाज क्रांती आघाडी,मा.श्री श्रीकांतभाऊ राठाेड से.नि.उपकुलसचिव उत्तर विद्यापिठ जळगाव,प्रा.राजुभाऊ आडे माजी उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,श्री खेमसिंगजी चव्हाण संचालक खरेदी विक्री संघ,श्री दिलिपभाऊ पवार संचालक खरेदी विक्री संघ,प्राचार्य श्री वसंतराव राठाेड प्रमुख पाहुणे म्हणुन यांची उपस्थीती हाेती तसेच रँलीमध्ये श्री भाऊरावजी जाधव व समस्त समाज बांधवाची उपस्थीती हाेती

महानायक यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा केल्यानंतर वसंत व्याख्यान मालाचे संयाेजक प्राचार्य श्री टी.व्ही.राठाेड व कारंजा बंजारा समाज बांधवांच्या सहकार्याने साकार झालेली वसंत व्याख्यान माला १५ चे पहिले पुष्प मा.प्राचार्य डाँ.गणपतरावजी राठाेड लातुर यांनी गुंफले त्यांना महानायक वसंतरावजी नाईक या़ंचे सामाजीक,राजकीय,व कृषी विषयक याेगदान या विषयावर अभ्यासपुर्ण व्याख्यान देवुन श्राेत्यांना मंत्रमुग्ध केले.

दुसरे व्याख्याते प्रा.मा.श्री अनिलभाऊ राठाेड वाशिम गाेर सेना प्रमुख यांना महानायक वसंतरावजी नाईक यांचे शैक्षणीक क्रांती व शेतक-यांचा काळ्या मातीशी नांत या विषयावर त्यांनी सखाेल माहिती दिली तसेच समाजाचे प्रश्न त्यावर उपाय तसेच विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले.त्यांतर गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह,नाईक साहेब यांचे जीवन चरीत्रावर लिहिलेले पुस्तक,सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवुन तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सहपत्नीक शाल श्रीफळ व ब्लाऊज पिस व पुष्पगुच्छ देवुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विलासभाऊ राठाेड राष्ट्रीय अध्यक्ष,राष्ट्रीय बंजारा परिषद,कार्यक्रमाचे मुख्यसुत्र संचलन साै.पुजाताई राठाेड,सहसचलन प्रा.मदनभाऊ जाधव,प्रा.सुनिल राठाेड व प्रा.मनिष वडते यांनी सुंदर सुत्रसंचलन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पवन हिरासिंगजी राठाेड यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीते करिता प्राचार्य श्री टी.व्ही.राठाेड,वसंत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री विष्णुजी आडे,श्री प्रकाश सखारामजी राठाेड उपाध्यक्ष,श्री पवन हिरासिंगजी राठाेड सचिव,प्रा.के.जी.चव्हाण काेषाध्यक्ष,सदस्य श्री श्यामभाऊ राठाेड,श्री किसन आडे,श्री रामदास पवार,श्री कैलास माणीकराव चव्हाण,प्रा.सुनिल राठाेड,श्री विनाेद माणीकराव राठाेड यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला बंजारा समाज बांधव व महिला भगिणी,समाजाचे अधिकारी,पदाधिकारी कर्मचारी बांधव,सानथाेर मंडळी बहुसंख्येंने उपस्थीत हाेते.