आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
ग्राम कासराळी,ता.बिलोली येथे दरवर्षीप्रमाणेच प्रतिष्ठापणा झालेल्या सवारींपैकी शनिवार दि.५ जुलै रोजी मुख्य थोरले,धाकले लालसाब अर्थात नाले हैदर सवारींचा मध्यरात्रीपासून पवित्र मोहरम सण भाविकांसह उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक वर्षापासून चालत असलेली ही मोहरम सणाची परंपरा खरेतर हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक ठरली आहे.
थोरले लालसाब अर्थात नाले हैदर पीर पंजा सवारी मानकरी शहा अहेमद टेलर यांच्या घर परिसरातून मध्यरात्री २ वाजता वाजत गाजत मिरवणूक निघून निजामकालीन घुमट परिसरातील धाकले लालसाब अर्थात नाले हैदर पीर पंजा सवारी येथे(भावांची)भेट झाल्यानंतर मुख्य धाकले नाले हैदर ताबूत सवारी मिरवणूक उत्सवाला सुरूवात होते.शनिवार दि.५ जुलै रोजी सकाळी १२ वाजता धाकले लालसाब सवारीचे वाजत गाजत परंपरागत विसर्जन(थंड)करण्यात येते.
थोरले धाकले नाले हैदर पीर पंजा सवारी उत्सवाचे मानकरी शहा अहेमद टेलर, शहा उस्मान, शहा मैनोद्दीन, शेख उस्मानसाब,शेख महेमूद,शेख हमीद,शेख तौफिक, शेख अफजल,मशाल मानकरी दंतापल्ले, सुधाकर इजुलकंठे आदी परिवार मानाचे मानकरी परंपरागत ठरलेले आहेत.
थोरले,धाकले लालसाब अर्थात नाले हैदर,इमाम हुसेन, मौलाली,चाँदपीर,कासिम दुल्हे आदि पीर पंजा सवारींची प्रतिष्ठापना केली जाते.निजामकालीन काही गोल मस्जिद घुमट,विहिर,कब्रस्तान,मोहर्रम दर्गा,हनुमान मंदिर, गाडगेबाबा मंदिर या परिसरात हा मोहरम सोहळा सलग दहा दिवस हिंदू-मुस्लिम भाविक साजरा करतात.पैशांच्या माळा,नवीन वस्त्र, रंगीबेरंगी बाशिंग,गुळ,साखर,शरबत, मिठाई,बत्ताशे,खोबरे एकमेकांस वाढवून गहू, तांदूळ भाविकांकडून दान दिले जाते.
गावातील हिंदू-मुस्लिम बांधव बाईलेकी,पाहुणे,ग्राम, तालुका, शासन, प्रशासन,आजी-माजी पदाधिकारी, कासराळी परिसरातील नवसधारी भाविक तथा समस्त गावकरी मंडळी यांची यंदाही उल्लेखनीय उपस्थिती होती.
Social Plugin