Ticker

6/recent/ticker-posts

तलवार बाळगून इंस्टाग्राम सोशल मिडिया साईटवर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन जणास ताब्यात घेऊन तलवार केली जप्त-स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना बुधवार दि ९ जुलै २०२५ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि इसम नामे संभाजी सुभाष जऱ्हाड,वय ३२ वर्ष रा.काटखेडा,ता.अंबड जि.जालना याने इंस्टाग्राम सोशल मिडीया साईटवर एक तलवारीसह व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.त्यानुषंगाने इसम नामे संभाजी सुभाष जऱ्हाड,वय ३२ वर्ष रा.काटखेडा,ता.अंबड जि.जालना यास काटखेडा येथुन ताब्यात घेवुन त्याकडे तलवारीच्या अनुषंगाने विचारणा करता त्याने सदरची तलवार त्याचा मित्र नामे विशाल बाबासाहेब धोंगडे,वय २३ वर्ष, रा.चौधरीनगर, ता.जि.जालना मुळगांव-भिलपुरी,ता.जि.जालना याकडुन आणुन व्हिडीओ तयार केला व त्यास परत केल्याचे सांगितले.त्यानुसार इसम नामे विशाल धोंगडे यास चौधरीनगर ता.जि.जालना येथुन ताब्यात घेवुन त्याकडे तलवारीबाबत विचारणा करता त्याने तलवार काढुन दिल्याने ती तपासकामी जप्त करुन दोन्हीही आरोपीतांविरुध्द सरकारतर्फ फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाणे, जालना येथे कलम ४,२५ भा.ह.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,मा.अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव,पोउपनि राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार सागर बाविस्कर,देविदास भोजने,इरशाद पटेल, संदीप चिंचोले,सतिष श्रीवास,भागवत खरात, अशोक जाधवर सर्व स्था.गु.शा.जालना यांनी केली आहे.