Ticker

6/recent/ticker-posts

मराठा समाजातील ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच खडकी येथे संपन्न .



प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे दौंड 

श्री शिवसेवा मराठा संघ आयोजित वार्षिक स्नेह मेळावा आयोजित केला होता. या मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. प्रठीण दादा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणुन मराठा महासंघाचे राज्यसंपर्क प्रमुख मा. श्री. अनिल ताडगे आणि मराठा महासंघाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष मा. सौ. रेखाताई कोंडे व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मा. श्री. प्रकाश सुपेकर संभाजी ब्रिगडचे पुणे शहर अध्यक्ष मा. श्री. प्रशांत कुंजीर, यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सारंगधर बडदे हे होते.या कार्यक्रमामध्ये इतिहास अभ्यासक श्री. ब. ही चिंचवडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच

डॉ. अर्चना विशाल येवले केमेस्ट्री विषयात Ph.D,डॉ. चैत्राली साळुंखे M.B.B.S,डॉ. वैष्णवी गेमाने M.B.B.S.,डॉ. हर्षदा बडदे M.B.B.S.

तसेच इयत्ता दहावी आणि बारावी तसेच पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा झाला इ. १०/१२ आणि पदवीधरअसे एकुण ४२ गुणवंत विद्यार्थी-विध्यार्थ्यांर्नीचा सत्कार करण्यात आला.तसेच सेवापुर्ती निमित्त १४ कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या निमित्त महीला आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. संस्था गेले २१ वर्षे विविध उपक्रमातुन समाज उपयोगी कार्य करीत आहे. या वेळी बोलताना प्रविण दादा गायकवाड यांनी संस्थेचे कौतुक केले आणि मराठा समाजातील विद्याथ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याअभिषेक दिनी अहद तजारवर तहद पेशावर औधा मुलुख आपला या उप्ती प्रमाणे संभाजी ब्रिगेड ने चालु केलेल्या अहद ऑस्ट्रेलिया तदह कॅनडा या उपक्रमास सहभाग होऊन विविध देशातील परकीय भाषा परदेशी विद्यापीठाचा आभ्यासक्रम करून आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी परदेशी नोकऱ्या मिळवाव्यात आर्थिक दृष्ट्या उद्योग, व्यवसायात सक्षम व्हावे.

यासाठी संस्थेचे श्री. रमेश वेढे-पाटील, अजीत काळे, अजय इद्वरे, हरिष भोसले, गणेश जाधव, प्रशांत जाधव, निखिल झेंडे, रणजीत पाटील, अरविंद गायकवाड, सतीश शिरसट, संदिप कोकाटे, मिलींद निगडे, उत्तमराव पानसरे, जयेश बडदे, संतोष पाटील, सुरज कदम, राहुल पवार, नवनाथ जाधव इ. कार्यकत्यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्रध्दा पवार यांनी केले प्रशांत जाधव यांनी सुत्र संचालन केले तर संदिप कोकाटे यांनी आभार मानले.