मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भावांनीवाले
आज दि 07/072025 रोजी मालेगाव तालुक्यातील मेडशी या गावात मोहरम उत्सव आनंदात साजरे करण्यात आले.. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या मेडशी या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा ही हिंदू मुस्लिम बांधवांकडून मोहरम उत्सव हा आनंदात साजरे करण्यात आले. अनेक वर्षापासून चालत असलेली ही मोहरम सणाची परंपरा खरेतर हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक ठरली आहे.या मिरवणूकीची सुरवात युसुफ पठाण यांच्या घरापासून रंगबिरंगी कागदे.फुलांनी सजलेल्या ताजिया, हातात हिरवी झेंडी घेऊन,वाजत गाजत झाली, गवळीपुरा येथील मोगलाना यांच्या देवस्थानला भेट देऊन. ठरलेल्या मार्गाने 1 वाजताच्या सुमारे गाव परिसरात ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये अनेक हिंदू मुस्लिम भाविक भक्तांनी आपले सहभाग नोंदवून आनंदोत्सव साजरा केला
हा मोहरम उत्सव सलग दहा दिवस हिंदू-मुस्लिम भाविक कडून साजरा केला जातोगुळ,साखर,शरबत, मिठाई,बत्ताशे,खोबरा खिचडीचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते. मोहरम या सणा निमित्त अनेक गोरगरीब गरजू व्यक्तींना गहू, तांदूळ भाविकांकडून दान दिले जाते. मिरवणुकीच्या अखेरीस ताजियाचे विसर्जन करून हे कार्यक्रम संपन्न केला जातो.या वर्षीही मोहरम है उसव मेडशी गावात आनंदात साजरे करण्यात आले
उत्सव समिती म्हणून धनु भवानीवाले(पैलवान). युसूफ पठाण. विश्वास साठे,शेख अकील,अक्षय नवले, मुनीर गारवे, सोहेल पठाण, इरफान भवानीवाले,अरिफ बेग व इतर बांधवांनी काम पाहीले.या मिरवणुकीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने पोलीस प्रशासन यांचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Social Plugin