अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जि.प.प्रा.शाळा घोंसी खुर्द येथील शिक्षक विलास भगवान मुळक यांनी भारत निवडणूक आयोगाच्या IIIDEM,नवी दिल्ली येथे दि.३ व ४ जुलै २०२५ रोजी झालेल्या विशेष निवडणूक प्रशिक्षणात यशस्वी सहभाग नोंदवला.या प्रशिक्षणात महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश, झारखंड व लडाख येथील निवडणूक अधिकारी सहभागी झाले होते.महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या १५७ अधिकाऱ्यांमध्ये विलास मुळक यांचा समावेश होता.
या वेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मार्गदर्शन झाले.सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी श्री किरण शार्दुल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन श्री विलास मुळक यांचा सन्मान करण्यात आला.प्रशिक्षणादरम्यान उपजिल्हाधिकारी संदीप कुमार अपार,बालाजी शेवाळे,नितीन इंगोले यांनी प्रभावी सत्र घेतली.
या यशाबद्दल प्रांताधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी,तहसीलदार श्रीमती मोनाली सोनवणे, नायब तहसीलदार संतोष इथापे,ऑपरेटर विठ्ठल कथले,किशोर थोरात,गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी,विस्तार अधिकारी बालासाहेब सोळंके, केंद्रप्रमुख शिवाजी राऊत,कैलास अरगडे सर, घोंसी खुर्द व म.चिंचोली येथील ग्रामस्थ व शिक्षक संघटनांनी विलास मुळक यांचे अभिनंदन केले आहे..
Social Plugin