पबकार नाव :-शांताराम उरसळ ग्रामीन प्रतिनिधी
हवेली : झाडांची संख्या कमी झाल्यामुळे निसर्गाचासमतोल बिघडला आहे त्यामुळे निसर्गात वनसंपदा वाढण्यासाठी शासनाने राबवलेल्या उपक्रमात पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव या विद्यालयाने सक्रिय सहभाग घेऊन एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात शेतात आपल्या आईसोबत वृक्ष लागवड करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. विद्यालयातील जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेऊन वृक्ष लागवडीचा व संवर्धनाचा संकल्प केला.
या उपक्रमासाठी विद्यालयातील पर्यावरण विभाग प्रमुख बेंद्रे धनश्री, वाठारकर स्वाती, चौधरी वंदना व विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड पर्यवेक्षक राजीव चव्हाण तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कृती केली त्याची पाहणी विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे तेथे शिक्षकांनी जाऊन केली. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चोरगे सचिव रंगनाथ आपकड उपाध्यक्ष रामदास चौधरी व सर्व विश्वस्तांनी कौतुक केले.
Social Plugin