Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले विद्यालय पारनेर येथे लोकमान्य टिळक याची जयंती साजरी



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

"स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क तो मी मिळवणारच"या त्यांच्या प्रसिद्ध घोषणेसाठी ते ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अभिमन्यू गाढवे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शाळेचे

मुख्याध्यापक यानी विद्यार्थ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी माहिती सांगत असताना टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते व ते भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अनेक ग्रंथ लिहिली.त्यामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ भारतीयासाठी प्रेरणा देणारे आहे.तसेच शिक्षकांनी सुद्धा मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांची भाषणे झाली.यावेळी विद्यालयातील शिक्षक राजेश भापकर सर,विश्वनाथ पोटफोडे सर,दत्ता शेरे सर,बंडू मामा व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .