नाशिक, प्रतिनिधी, अमन शेख ,
गाण्यांची आवड असलेली रसिक आणि गाण्यांची आवड असलेले गायक हे नेहमीच सर्वच जगात आगळावेगळा स्वाद , निर्माण करत असतात कुठे गाणी म्हणून तर कुठे गाणी ऐकून प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याच्या रंगात रंगलेला असतो , नेहमीच आपल्या आयुष्यात होत असणाऱ्या हालचाली जडणघडणी किंवा काही क्षण असे असतात की असे वाटते की हे ऐकलेले गाणी आपल्यासाठीच बनलेली आहेत .
याचप्रमाणे हीच परंपरा जपत नेहमीच अमन फाउंडेशन तर्फे खूप सारे सेवा कार्य होत असतात तर यावेळी त्यांना साथ भेटली तर ती चतुरंग म्युझिकल ग्रुप यांची या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने एक आगळा वेगळा कार्यक्रम नाशिक सारख्या शहरात बघायला मिळाला, त्यामध्ये, सुमारे 100 ते 200 लोक रसिक म्हणून तर सुमारे 15 ते 20 गायक आणि गायिका असे होते.
यावेळी बऱ्याच गाण्यांची मैफिल तेथे रमली होती लोकांनी चांगला आस्वाद घेतला .या कार्यक्रमाचे विशेष आयोजन श्री. जावेद शेख आणि सौ. संगीता पगारे या दोघांनी केले होते. तसेच यामध्ये आयोजक म्हणून हरीश भाई ठक्कर , प्रकाशजी गोसावी , अनिल पोटे , श्री के वाडेकर, तसेच विशेष जोड म्हणून अमन फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष आणि नेहमीच सामाजिक कामात व्यस्त असणारे डॉ. अमन शेख यांची देखील प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे उद्घाटन हे मा. पोलीस उपायुक्त श्री. डॉ. संजय अपरांती यांच्या हस्ते पार पडले.
तर कार्यक्रमाच्या वेळी काही जुनी गाणी म्हटली त्यात ,अनिल नेरूळकर, के वाडेकर, नवनाथ पारखे ,मधुकर साळवे, अस्लम भाई ,कमलेश दास ,राजेश पाटील ,निलेश शिंदे, विलास अहिरे, सुनीता माते ,सत्यभामा वाळवंटे ,चंदाताई महाले ,जयश्री दांडगे ,योगिता उदावंत, या सर्व गायकांनी या कार्यक्रमाची शान वाढवली, आणि अति उत्कृष्ट अशी गाणी म्हणून रसिकांना मोहित केले, अशाच प्रकारचे गाणी नेहमीच नाशिकमध्ये कार्यक्रमांद्वारे आम्ही सादर करू हे उद्देश या कार्यक्रमातून समोर आले.
Social Plugin