●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
●मौजे आदमपूर,ता.बिलोली येथे दि.६ जुलै रोजी ठीक दुपारी साडेबारा वाजता सात पीर पंजे सवारी प्रतिष्ठापना पैकी करबला पीर पंजे सवारीची वाजत गाजत मिरवणूक मोहरम दर्गा परिसर म्हणजेच अशुरखाना मैदानात 'करबला की दोस चारोद्दीन...'असे म्हणत या गजरात काढण्यात झाली.
पवित्र चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम नूतन वर्षारंभ,मोहरम मासारंभ पर्व व हिजरी सन १४४६ ला सुरुवात होते.मोहरम हा सण तब्बल दहा दिवस हिंदू-मुस्लिम भाविक साजरा करतात.त्यात हज़रत करबला, कासिम दुल्हे, चाँदपीर,हसेन हुसेन,मौलाली,नाले हैदर, इमाम हुसेन आदि पीर पंजा सवारींची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते.सवारींचे मानकरी दरवर्षाला अनुक्रमे शेख जमनसाब चाँदसाब शेख अख्तर लालशा हे दहा दिवस असतात.या वर्षी मुजावर शेख अख्तर यांनी पंजे सवारी स्थळी सेवा दिली.
सवारींना नवे वस्ञ, बाशिंग, मोगरा फुलांचे हार ,उदबत्ती ,उद आणि साखर ,गुळ, शरबत ,मिठाई, बत्तासे, खोबर, भात, खिचडी ,गव्हाचे घोडे,रोट,गहू,तांदूळ इत्यादी पदार्थ नैवेद्य म्हणून हिंदू-मुस्लिम भाविक दहा दिवस अर्पण करीत असतात. अनेक वर्षांपासून चालत आलेला हा मोहरम उत्सव आदमपूर परिसरात सर्वधर्मसमभाव एकात्मतेचे प्रतिक बनले आहे.सदरील मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम नवसधारी भाविक व समस्त गावकरी,महिला,लहान मुलांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
Social Plugin