Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्याची दुरवस्था, मंजूर रस्ता कामाला मुहूर्त सापडेना किनगाव राजाकडून पांगरी उगलेला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था



प्रतिनिधी जिवन साळवे 

सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले गावाला जोडणारा मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, किनगाव राजा ते पांगरी उगले या पाच किलोमीटर अंतरावर रस्त्यवर जागोजागी खड्डेच खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावीलागते,जीव घेणे प्रवास करावा लागत आहे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून व्यवस्थित दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थी व ग्रामस्थातून होत आहे, मंजूर झालेला रस्ता हा अजून का कामाला सुरुवात होईना ,

 अशा खड्यामुळे झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून रात्रीचे खड्ड्याचाअंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहे, किनगाव राजा ते पांगरी उगले रोड पाच किलोमीटर अंतर असलेला हा रस्त्या मध्ये खड्डे पडल्यामुळे वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे