बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
काटेवाडी (बुध) येथील सर्वोदय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा पद्मभूषण डॉ. पां. वा. सुखात्मे समाजभूषण पुरस्कार वैज्ञानिक, साहित्य, संशोधन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पुणे येथील 'भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर' डॉ. अभिजित सोनवणे यांना जाहीर झाला आहे.
सोमवारी (ता. २८) बुध येथील श्री नागनाथ विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये दुपारी अडीच वाजता डॉ. पां. वा. सुखात्मे यांनी संशोधनासाठी निवड केलेले विद्यार्थी दत्ताजीराव जाधव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयहिंद फाउंडेशन खटाव तालुकाध्यक्षा हेमलता फडतरे असतील. प्राचार्य अंकुश भांगरे, पोपटराव जगताप, परशुराम घोरपडे, उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे, रविराज लाड, मंगेश नलवडे, कल्याणी महामुलकर, प्रतापराव घाडगे, महेंद्र जगदाळे, नितीन गाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदयी यांनी सांगितले.
या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजिला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Social Plugin