Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेचे दुर्लक्ष आणि वाहतूक शाखेची कामगिरी...



नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख ,

सतत सुरू असलेल्या पावसाने प्रत्येक ठिकाणी खड्डेमय वातावरण झालेले आहे . खड्ड्यांमुळे गाडी चालवणे जणू अशक्यच आहे , आदळ आपट करत नाशिककर आपापल्या व्यस्त आयुष्यात विलीन आहे. या कामांकडे लक्ष देणार तरी कोण ? कुठे चेंबर मधून पाणी तर कुठे गटारी वाहतात सतत येत असलेल्या बातम्यांमुळे देखील काही काम होत आहेत तर काही कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे, नक्की चूक कोणाची ? नक्की जबाबदारी कोणाची ? या सर्व गोष्टींवर लक्ष देणार कोण ? हा प्रश्न उद्भवत आहे. परंतु आजवर माणुसकी हा धर्म आपणास बघायला मिळतो खूप ठिकाणी काही सामान्य लोक खड्डे बुजवतात , कोणी मुरूम टाकतात पाणी काढत , कोणी तिकडे झाडे टाकून लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगतात , जेणेकरून कुठलीही दुर्घटना होऊ नये किंवा जीवित वित्तहानी होऊ नये .

अशा प्रकारचे कार्य रोज बघायला मिळत आहेत याचप्रमाणे दळणवळणीचे ठिकाण असणारे मुंबई नाका परिसर या ठिकाणी एक आगळी वेगळी घटना बघायला मिळाली. मुंबई नाका परिसरात खड्डे पडलेले असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी जास्त होती त्यावर मनपाचे दुर्लक्षच होत होते त्यामुळे

मुंबई नाका पोलीस स्टेशन युनिट 2 वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे साहेब यांचे नेतृत्वाखाली समोर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीची प्रमाण कोंडीचे होऊन ट्राफिक जाम होत होती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश पवार पोलीस आमलदार संदीप घुगे पोलीस अमलदार संदीप माळेकर यांनी रहदारीस अडथळा होणारे खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत केली....

आणि आता त्या ठिकाणी गर्दी होत नसून वाहतूक व्यवस्था सुरळीत चालत आहे . कितीतरी दुर्घटना होण्यापासून टळल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पडून असलेले काम मार्गी लागले या कामगिरीचे कर्तुत्व करावेत हे कमी आहे. या घटनेतून असे बघायला मिळते की एक कर्तुत्ववान जबाबदार नागरिक हा प्रत्येक व्यक्ती असलाच पाहिजे ज्याने कुठल्याही परिस्थितीत कुठलेही काम कोणाचेही लक्ष नसताना स्वतःहून पूर्ण करण्याची जिद्द नेहमी जपावी आणि माणुसकी धर्म पूर्ण करावा समाजात वावरताना यांनी निसर्गात वावरताना आपणही या निसर्गाची या वातावरणाची काही देणं लागतो ही जाणीव प्रत्येक नागरिकाची असली पाहिजे.