राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. अब्दुल कलाम फोरम, दिग्रस यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक,दिग्रस येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक बैजनाथ मुंडे, तसेच पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिग्रस शहरातील माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग, रवींद्र अरगडे, माजी नप उपाध्यक्ष जावेद पटेल, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, डॉ कलाम फोरमचे संस्थापक मिर्जा अफजल बेग, जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य सुधीर देशमुख, पंचायत समिती माजी सभापती मिलिंद मानकर, माजी सभापती नप दीपक वानखडे, सैय्यद अक्रम, बाबुसिंग जाधव, जावेद परसुवाले, एल पी राठोड, फारुक अहेमद, तस्लिम पढेवाले, ज्येष्ठ शिव सैनिक पुनम पटेल, हरीश सांखला, भीमराव खारोडे, राहुल देशपांडे, स्वप्नील दुधे, रोशन शेख, अन्वर धोंगडे, वजीर कोथमिरे, सरपंच देऊरवाडा नितीन इंगोले, पोलिस पाटील जिंतूरकर, संजय हारके, दत्ता वानखडे, भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, संदीप झाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे शंकर जाधव, अरबाज धारिवाला, फैय्याज मलनस, राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पाटील, अरुणावती प्रकल्प कार्यकारी अभियंता विनोद बागुल, बुटले महाविद्यालय प्राचार्य अरविंद लाडोळे, माजी उपप्राचार्य प्रा. सुधीर पाठक, प्रा. प्रवीण चांडक, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, केंद्रप्रमुख किरण बारशे, सेवानिवृत्त वन अधिकारी बशीर शेख, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पी पी पप्पुवाले, पत्रकार रफिक शेख, अजित महिन्द्रे, सदाशिव कांबळे, अनुराग मिश्रा, घंटी बाबा मंदिर संस्थानचे गोपाल शहा, मराठा सेवा संघाचे तोमरेश्वर ठाकरे, गजानन पाटील, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष शुभदा पाटील, शिक्षक पतसंस्थचे संचालक सुजित ठाकरे, एकनाथ मोगल, धन्नू मस्के, राजू ढोके, श्याम विणकरे, सलीम नौरंगाबादे, मधुकर डाखोरे, शीतील सोनुलकर, अमीन नौरंगाबादे, साहेबराव राठोड, ॲड प्रवीण ढाले, दिवाकर इहरे, अमित चिद्दरवार, शारीरिक शिक्षक संघटना तालुका संयोजक सुरेंद्र राठोड या मान्यवरांनी डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करुन आदरांजली वाहिली. या सर्वांनी "स्वप्न तेच जे तुम्हाला झोपू देत नाही" या कलाम यांच्या अजरामर विचारांना उजाळा देत, त्यांच्या कार्याचे आणि योगदानाचे स्मरण केले.
डॉ. कलाम यांचे संपूर्ण आयुष्य देशभक्ती, विज्ञान, शिक्षण आणि नवउत्साह यांना समर्पित होते. त्यांच्या स्वप्नातला भारत – एक विकसित महासत्ता – आजही अनेकांच्या प्रेरणेचा स्रोत आहे. त्यांचे विचार आणि मूल्यं नव्या पिढीला मार्गदर्शन करत राहतील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फोरम, दिग्रस यांनी केले. फोरमचे अध्यक्ष फिरोज खान, उपाध्यक्ष हाजी अजीम खान, हाजी करीम शेख, सचिव आमीन चौहान, कार्याध्यक्ष नासीर मिर्जा, इरफान खान, अमीन नौरंगाबादे, मोहम्मद परसुवाले, फैयाज शेख, फारुक चव्हाण, अजीम शेख, सोनू शेख, आशिष अगलदरे, आसिफ काजी, सादिक गारवे, आसिफ शेख, जुनेद शेख यांनी परिश्रम घेतले. पोलीस प्रशासन तसेच उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार फोरमच्यावतीने मानण्यात आले.
Social Plugin