Ticker

6/recent/ticker-posts

देशातील पहिल्या विधिज्ञांच्या साहित्य संमेलनात चमकले जाफराबादचे विधीज्ञ शरद पाटील वाकडे...



साहित्य संमेलनामध्ये विसरू नका मराठीला या कवितेने वेधले सर्वांच्या लक्ष.


टेंभुर्णी/ प्रतिनिधी विष्णु मगर 


छत्रपती संभाजीनगर येथे कांचनवाडी येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजतर्फे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी देशातील पहिल्या विधीज्ञ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते या साहित्य संमेलनामध्ये जाफराबाद येथील विधीज्ञ शरद पाटील वाकडे यांनी विसरू नका मराठीला या कवितेच्या सादरीकरणाने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे साहेब यांनी सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव केला.

या गौरवाबद्दल अँड.शरद वाकडे यांचे वकील संघ जाफराबाद, तालुक्यातील नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. या साहित्य संमेलनात मराठी भाषा समृद्ध व्हावी मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे शिवाय जतन आणि संवर्धनासाठी मनापासून स्थायी स्वरूपाचे प्रयत्न करावे लागतील असा सूर, विधिज्ञांच्या साहित्य संमेलनातून निघाला..

या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माननीय श्री.प्रसन्न वराळे साहेब,माजी न्यायाधीश अभय ओक साहेब,उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनीष चितळे,विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बिंदू रोनाल्ड,स्वागताध्यक्ष अँड.अनिल गोळेगावकर,समन्यवक अँड.संजीव देशपांडे सहसमन्वयक अँड.संभाजी टोपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी या साहित्य संमेलनात अनेक मान्यवरांनी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहत्यिक कवी असणाऱ्या विधीज्ञ मंडळीने सहभाग घेतला होता.