Ticker

6/recent/ticker-posts

वसंतराव नाईक विद्यालय, वरंदळी येथे वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न



 राजपाल बनसोड  प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती वसंतराव नाईक विद्यालय, वरंदळी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे युवा नेते तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख मा. श्री धीरज भाऊ आडे यांच्या हस्ते करण्यात आलेले वृक्षारोपण. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत वसंतराव नाईक यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “वृक्ष लावा, जीवन वाढवा — वसंतराव नाईकांना हीच खरी आदरांजली!” या घोषवाक्याखाली सहभाग नोंदवला.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भाषणे, गीतं व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत या जयंती कार्यक्रमात रंग भरले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व त्यांच्या टीमचे मोलाचे योगदान लाभले.