Ticker

6/recent/ticker-posts

अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाऊ नये-आ. जितेश अंतापूरकर यांची विधानसभेत मागणी



   भाजपा सरचिटणीस दीपक संगमकर यांनी हा विषय मांडण्याची केली होती आमदार महोदयांकडे मागणी                                                  

प्रतिनिधी-  जावेद अहमद                                           

शैक्षणिक सत्र 2025--26 मधील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा राज्यभर ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. परंतु या प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना याचा खूप त्रास होत असल्याने प्रवेश निश्चित करता येण्यास अडचणी येत आहेत.

वरील सर्व विद्यार्थ्यांची अडचणी लक्षात घेऊन देगलूर शहर मंडळातील भाजपा सरचिटणीस दिपक भाऊ संगमकर यांनी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय युवा आमदार जितेश अंतापुरकर यांना आज सकाळीच याविषयी फोनवर बोलून समस्या सांगितली असता आमदार महोदयांनी ताबडतोब या विषयाचे गांभीर्य समजून घेऊन, सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून राज्यातील विद्यार्थी व पालकांचे अडचणी लक्षात घेऊन सरकारने ताबडतोब यावर मार्ग काढावा अशी विनंती सरकारला केली. 

एका सामान्य कार्यकर्त्यांनी फोनवर सांगितलेले विषय सन्माननीय आमदार महोदयांनी विधिमंडळात मांडल्यामुळे त्यांचे भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व विद्यार्थी, पालक वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.