प्रतिनिधी :-सागर इंगोले
अनेक दिवसापासून सुरु असलेले राष्ट्रसंताच्या भूमिपासून ते पाहपळ निमगाव्हाण पर्यंत पदयात्रा कडून .मा. राज्यमंत्री,बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात सात -बारा कोरा,-कोरा शेतकरी संपूर्ण कर्जमाफी,दयावी दिव्यांग व विधवा महिला,पेन्शन, 6000 रु. दयावी ग्रामपंचायत कर्मचारी,पगारवाड, मेंढपाळ यांना,मेंड्या चारण्यासाठी जमीन देणे, मच्छीमार,यांना त्यांच्या मालाला योग्य भlव ठरवून द्यावा, शेतकऱ्यांना पेरणी ते कंपनी पर्यंत खर्च mrgs मध्ये घेणे अशा सतरा प्रकारच्या विविध्द मागण्या सरकार कडून अजूनही पूर्ण झालेल्या नसल्यामुळे बच्चू कडू यांनी महाराष्ट्र भर चक्का जाम आंदोलन पुकारले या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष्याकडून मुकुटबन - वणी रस्त्यावर खडकी चौफुली येथे मोठ्या संखेने तालुक्यातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, सरपंच संघटना, मेढापाळ, व मच्छिमार रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे मुकुटबन -वणी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता आंदोलकांनी शेतकरी कर्जमाफी द्या दिव्यांग बांधवांना 6000हजार पेन्शन द्या, अश्या प्रमुख मागण्या विषयी अनेक मागण्या विषयी घोषना देण्यात आल्या व या आंदोलनाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकार ला जाग कधी येईल असा शेतकरी व दिव्यांग बांधवानी प्रश्न केला. आंदोलन स्थळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली व गाड्याच्या लांबच लांब रांगा येथे पाहायला मिळाल्या पोलिसांनी हॆ चक्का जाम आंदोलन संपुष्टात आणले यांचे पडसाद समूर्ण महाराष्टlत पाहायला मिळाले.
Social Plugin