अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील शेतकरी कृष्णा शिंदे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे घुंगर्डे हादगाव येथील कृषी सेवा केंद्राची तक्रार करण्यात आली होती.यावेळी तालुका कृषी गुणनियत्रंण अधिकारी यांनी दि 23 जुलै रोजी घुंगर्डे हादगाव येथील कृषी सेवक केंद्राची झाडाझडती करून तपासणी करण्यात आली. घुंगर्डे हादगाव येथील सहा कृषी सेवा केंद्र चालकाने शेतकऱ्यांना लिंकिंग खते घेण्यासाठी दबाव टाकून लिंकिंग खते घेण्यास भाग पाडले होते.संबंधित शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
यामध्ये सहा ही कृषी सेवा केंद्रावर अनेक त्रुटी आढळून आल्या.कृषी विभागाच्या पथकाने घुंगर्डे हादगाव येथील सहा दुकानाची तपासणी करून दुकानदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.सात दिवसांत त्रुटीची पूर्तता करण्यात यावी नसता दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल असे तालुका कृषी गुणनियत्रंण अधिकारी यांनी सांगितले.कृषी सेवा केंद्र चालकांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मागील ते खते देण्यात यावेत लिंकीग खते घेण्याची अट घालु नये असे तालुका कृषी गुणनियत्रंण अधिकारी जी के वाघ यांनी सांगितले..
Social Plugin